क्लब कानसेन ची अनोखी मैफील....
प्रसिध्द गायक व संगीतकार हेमंत पेंडसे व त्यांचे सहकारी मित्रमंडळी यांनी मांडलेली ही आगळी वेगळी संकल्पना.
केवळ मनोरंजन म्हणून शास्त्रीय संगीताकडे बघता येत नाही , तर हे ऐकताना जाणीवा समृद्ध झाल्यास यातील स्वरानंद काहीतरी वेगळी अनुभूती देतो हे अलीकडे लोकांना हळूहळू लक्षात येऊ लागलं आहे .
"शास्त्रीय गायनाच्या बद्दल काहीच माहीती नसलेल्या कार्यक्रमांना कशाला जावे ? " असा विचार करणाऱ्या रसिकांची संख्या लक्षणीय आहे ,
हे लक्षात घेऊन प्रसिद्ध शास्त्रीय गायक व संंगीतकार हेमंत पेंडसे यांनी या संकल्पनेवर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले.
क्लबकानसेन चा हा या वर्षातील तिसरा कार्यक्रम आहे.
दि.24 नोव्हेंबर रोजी रविवारी सकाळी 9 वाजता एम.ई.एस.ऑडीटोरीयम - बालशिक्षणमंदीर मयूरकॉलनी कोथरुड पुणे येथे सकाळच्या रागांची मैफील आयोजित केलेली आहे.
श्री.सुयोगकुंडलकर यांचे हर्मोनियम वादन व सौ.आरतीकुंडलकर यांचे शास्त्रीयगायन होणार असून एका प्रचलित व अप्रचलित रागाची ओळख हेमंतपेंडसे यांचे कडून समजावून घेता येणार आहे. केवळ व्याख्या , परिभाषा , या मध्ये न अडकवता प्रत्यक्ष मैफिलीच्या साहाय्याने हे गायन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एका रागातील सरगम गीतामधून त्या रागाची ओळख करून दिली जाणार असून श्रोत्यांकडून देखील हे सरगम गीत गाऊन घेतले जाणार आहे.
याच कार्यक्रमामध्ये वादी-संवादी ह्या परिसंवादाचे आयोजन देखिल करण्यात आलेले असून तीन पिढ्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. यामध्ये अपर्णागुरव-मिलींदगुरव प्रणवगुरव-कोमलगुरव व सुयोगकुंडलकर-आरतीकुंडलकर
हे कलाकार आपले अनुभव व मतं नोंंदवणार आहेत.
भारतीय संगीताच्या परिघाबाहेर असलेल्यांसाठीच ही संकल्पना आहे. सुजाण श्रोत्यांच्या संख्येत वाढ करणे व यामध्ये शास्त्रीय संगीताची चळवळ परिणामकारक चालू रहावी यासाठी क्लब कानसेन मध्ये मेम्बर्स ची संख्या फक्त सव्वाशे ठेवण्यात येणार आहे. हे कार्यक्रम सशुल्क आहेत.
तीन तासांची ही मैफिल असून मनहर संगीत सभा तर्फे याचे आयोजन केले जाणार आहे. मेंबरशिप घेतलेल्या सभासदांना एका कार्डावर दोघांना विनामूल्य प्रवेश आहे. व मेम्बर्शीप न घेतलेल्या फक्त शंभर रसिकांसाठी दिनांक १४ नोव्हेंबर पासून ऑन लाईन तिकीटं देखिल उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. रागानेक्स्ट च्या https://tickets.raganxt.com/
या लींक वरुन ही तिकीटं घेता येतील. तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे संयोजकांच्या वतीने रसिकांना आवाहन करण्यात आले आहे.
आपले स्वागतोत्सुक
श्री. अनिल पटवर्धन ( मुख्य सचिव - क्लब कानसेन )
सौ. राधिका ताम्हनकर ( सह सचिव - क्लब कानसेन )
श्री. राहुल आगरकर ( कोषाध्यक्ष - क्लब कानसेन )
Venue
M.E.S Auditorium, Balshikshan english medium school area, Mayur colony, Kothrud, Pune
Sunday 24th November 2019, 9:00 AM
Mobile : 9850993760